Krutika deo biography of mahatma


कृतिका देव

या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन
हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.

कृतिका देव
जन्म
५ मे
नाशिक, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्वभारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख नाटके दोन गोष्टी, ओ फ्रिदा.
प्रमुख चित्रपट पानिपत,हवाईजादा, हॅप्पी जर्नी, प्राईम टाईम, राजवाडे ॲंड सन्स, बकेट लिस्ट.

कृतिका देव (जन्म : ५ मे) ही अभिनेत्री असून, तिने अनेक दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट व नाटके यांतून तिने काम केले आहे, हवाईजादा, हॅप्पी जर्नी, प्राईम टाईम, राजवाडे अँड सन्स [१], बकेट लिस्ट अश्या अनेक चित्रपटांमधून तिने भूमिका केल्या आहेत, तर इंटरनेट वाला लव्ह [२] या कलर्स हिंदी वाहिनीवरील मालिकांत ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

कृत्तिकाने आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित पानिपत (२०१९) मध्ये श्रीमंत विश्वासराव पेशव्यांची पत्नी रधिकाबाईची[३] भूमिका केली आहे.[४]

सुरुवातीचे जीवन

[संपादन]

नाशिकमध्ये जन्मलेल्या कृतिकाने तिचे मानसशास्त्र हा विषय घेऊन पदवीपर्यंतचे शिक्षण पुण्याच्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून पूर्ण केले., अभिनेत्री असलेली कृतिका ही कथ्थक नृत्यांगना असून तिने विद्याहारी देशपांडे यांच्याकडे कथ्थकचे प्रशिक्षण घेतले आहे.

[५]

कलाजीवन

[संपादन]

कृतिका देवने "दोन गोष्टी", "ओ फ्रिदा" या नाटकांतून कला जीवनास प्रारंभ केला [६][७], यानंतर २०१४ मध्ये आलेल्या हॅपी जर्नी या सचिन कुंडलकर दिग्दर्शित चित्रपटात तरुण एलीसचे पात्र साकारले, यानंतर २०१५ मध्ये विभू पुरी दिग्दर्शित हवाईजादा या हिंदी चित्रपटात आयुषमान खुराणा, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी शारदा या कलाकारांसोबत "चंपा" हे पात्र साकारले, त्यानंतर २०१५ मधे प्रदर्शित प्राईम टाईम या चित्रपटात तिने लहान काव्या आपटेची भूमिका साकारली, २०१५ मध्ये आलेल्या सचिन कुंडलकर दिग्दर्शित राजवाडे अँड सन्स या चित्रपटात तिने श्वेता राजवाडे ही भूमिका साकारली, २०१८ मधे आलेल्या बकेट लिस्ट या चित्रपटात तिने माधुरी दीक्षितसोबत काम केले.

चित्रपट

[संपादन]

मालिका

[संपादन]

संदर्भ व नोंदी

[संपादन]